अमेरिका होर्मुझमधील नाकेबंदी तात्काळ हटवणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. त्याचवेळी इराणसोबत शांतता करारासाठी त्यांनी अनेक अटीही घातल्या.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टथ सोशलवर पोस्ट शेअर केली आहे.
कधीही अण्वस्त्र किंवा अणुबॉम्ब विकसित करणार नाहीत, याची हमी इराणने दिली पाहिजे. त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ खुली केली पाहिजे. टोल आकारणी थांबवली पाहिजे, असे नमूद करतानाच पाण्यात सुरुंग पेरले असतील ते तत्काळ नष्ट करा, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले. इराणकडील युरेनियम साठा नष्ट करण्याची धमकीही त्यांनी दिली. दरम्यान, इराणकडून मात्र त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

