Dailyhunt
अमेरिका पासपोर्टवर छापणार डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्राध्यक्षाचा फोटो दिसणार

अमेरिका पासपोर्टवर छापणार डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्राध्यक्षाचा फोटो दिसणार

सामना 1 week ago

मेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पासपोर्ट डिझाईनमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पह्टो विशेष मर्यादित आवृत्तीतील (लिमिटेड एडिशन) पासपोर्टवर झळकणार असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका विद्यमान राष्ट्राध्यक्षाचा फोटो पासपोर्टवर झळकणार आहे.

पासपोर्टचेस्वरूपआणिवैशिष्टय़े

या विशेष पासपोर्टची रचना अत्यंत वेगळी आहे. यामध्ये अमेरिकेच्या मूळ 'स्वातंत्र्य घोषणापत्रा'वर ट्रम्प यांचा अधिकृत फोटो छापण्यात आला आहे. त्यासोबतच त्यांची स्वाक्षरी सोनेरी अक्षरात कोरलेली असेल. याशिवाय अमेरिकेच्या निर्मितीमध्ये मोलाचा वाटा असलेल्या 'फाउंडिंग फादर्स' यांचे ऐतिहासिक चित्रही या पासपोर्टवर पाहायला मिळणार आहे.

स्टेट डिपार्टमेंटचे प्रवत्ते टॉमी पिगॉट यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. त्यांनी सांगितले की, ''देशाच्या 250 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ही विशेष भेट म्हणून काही निवडक लोकांसाठी हे पासपोर्ट तयार करण्यात आले आहेत.'' वॉशिंग्टनमधील पासपोर्ट एजन्सीत प्रत्यक्ष जाऊन नूतनीकरण करणाऱ्या नागरिकांना हा नवीन डिझाइनचा पासपोर्ट दिला जाईल. मात्र ऑनलाइन नूतनीकरण किंवा इतर राज्यांमधील केंद्रांवर सध्याचे जुने डिझाइनच कायम राहणार आहे.

ऐतिहासिकसंदर्भआणिवादाचीशक्यता

सध्या अमेरिकन पासपोर्टवर फ्रँसिस की यांच्या 'फोर्ट मॅकहेन्री' युद्धाशी संबंधित चित्राचा वापर केला जातो. सध्याच्या पासपोर्टवर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी किंवा चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल यासारखी चित्रे आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची प्रतिमा समाविष्ट करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक बदल मानला जात आहे. दरम्यान, या निर्णयावर अमेरिकेतील राजकीय वर्तुळात चर्चा आणि वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मात्र हा निर्णय 250 व्या स्वातंत्र्य सोहळ्याचा एक भाग असल्याचे सांगितले असून येत्या उन्हाळ्यापासून या नवीन पासपोर्टचे वितरण सुरू होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana