Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमेरिकेकडून 2.6 अब्ज डॉलर्सच्या गॅसची खरेदी, एलपीजी आयातीमध्ये 254 टक्क्यांची वाढ

अमेरिकेकडून 2.6 अब्ज डॉलर्सच्या गॅसची खरेदी, एलपीजी आयातीमध्ये 254 टक्क्यांची वाढ

सामना 1 week ago

राण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अद्याप न संपल्याने त्याचा परिणाम हिंदुस्थानवर होत आहे. आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेकडून हिंदुस्थानच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या म्हणजेच एलपीजीच्या आयातीत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 254 टक्क्यांची वाढ झाली आहे.

या काळात हिंदुस्थानने अमेरिकेकडून तब्बल 2.60 अब्ज डॉलर्सची खरेदी केली आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे.

एलपीजी आयातीतील ही मोठी वाढ एप्रिल ते जून 2026 या कालावधीत झाली आहे. याच काळात जगभरातील ऊर्जा पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे आखाती देशांकडून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. एलपीजी म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसची आयात वाढल्याने हिंदुस्थानला यासाठी जास्त अमेरिकन डॉलर मोजावे लागत आहेत. एप्रिल ते जून 2025 या कालावधीत अमेरिकेकडून हिंदुस्थानने 3.70 अब्ज डॉलर किमतीचे कच्चे तेल आयात केले होते. 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेकडून या उत्पादनांची आयात जवळपास 375 दशलक्ष डॉलर होती. तीच रक्कम आता 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत वाढून 2.60 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana