Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमेरिकेत आढळला दुर्मिळ निळ्या रंगाचा झिंगा, फोटो व्हायरल

अमेरिकेत आढळला दुर्मिळ निळ्या रंगाचा झिंगा, फोटो व्हायरल

सामना 4 years ago

अमेरिकेत मासेमारी करताना एका व्यक्तीला दुर्मिळ निळ्या रंगाचा झिंगा सापडला आहे. या झिंग्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

अमेरिकेत कॅप्ट जो अँड सन्स ही झिंगा विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीचा कर्मचारी टॉबीला झिंगा पकडताना त्याच्या गळाला हा दुर्मिळ झिंगा लागला.

टॉबीने हा झिंगा दुकानात आणला आणि आपल्या मालकाला दाखवला.

कंपनीने या झिंग्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले.

नंतर या दुर्मिळ निळ्या रंगाच्या झिंग्याला पुन्हा सोडण्यात आले. दोन तीन वर्षातून एखाद वेळेला अशा प्रकारचा झिंगा जाळ्यात अडकतो असे कंपनीने सांगितले.

हा झिंगा अतिशय दुर्मिळ असून दोन कोटी झिंग्यामध्ये एखादा असा झिंगा आढळतो असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana