Dailyhunt
अमेरिकेत 'अल्फा मेल'चे महागडे प्रशिक्षण, तीन दिवसांसाठी 2.78 लाख रुपये फी

अमेरिकेत 'अल्फा मेल'चे महागडे प्रशिक्षण, तीन दिवसांसाठी 2.78 लाख रुपये फी

सामना 1 week ago

मेरिकेत पुरुषांना 'अल्फा मेल' म्हणजेच दबंग पुरुष बनवण्याची मोठी क्रेझ सुरू आहे. यासाठी प्रशिक्षण शिबिरे आणि अभ्यासक्रम वेगाने वाढत असून अवघ्या तीन दिवसांच्या या शिबिरासाठी 2.78 लाख रुपये फी आकारली जात आहे.

या प्रशिक्षणात पुरुषाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना जुन्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर चिखलात रांगणे, जड वस्तू उचलणे, उशीशिवाय झोपणे, अंधाऱ्या बोगद्यातून चालणे यांसारखी काम करून घेतली जातात. बॅगमध्ये रंगीबेरंगी दगड ठेवले जातात, ज्यांना राग, अपराधीपणाची भावना, लाज आणि दुःखाचे प्रतीक मानले जाते. हा ट्रेंड आता प्रौढांमधून 12 ते 17 वर्षांच्या किशोरांपर्यंत पोहोचत आहे. पॅलिपहर्नियामध्ये अशा सत्रांमध्ये मुलांकडून जड वजन उचलून, धावपळ करून आणि त्यांना 7 मिनिटांपर्यंत बर्फासारख्या थंड पाण्यात ठेवले जाते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana