ताज्या
अमित शहांचं ट्विटर अकाउंट ब्लॉक केलंच कसं? ट्विटरला भाजप खासदारांचा सवाल

संसदीय मंडळाच्या सदस्यांची ट्विटरच्या प्रतिनिधी गटासोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या वेळी भाजपच्या सदस्यांनी 2020 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अधिकृत ट्विटर काही काळासाठी बंद करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याच्याबद्दल ट्विटरने स्पष्टीकरण द्यावे असा त्यांचा आग्रह केली. असे वृत्त इंडिया टूडेने सूत्रांच्या हवाल्याने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
माहिती तंत्रज्ञान संदर्भातील संसदेच्या स्थायी समितीची गुरुवारी फेसबुक, ट्विटर आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयच्या सदस्यांसह एक विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या वेळी सोशल मीडिया, नागरिकांचे अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माहितीची सुरक्षा अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
भाजपच्या काही सदस्यांनी ट्विटरच्या fact-checking प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला होता. देशाच्या गृहमंत्र्यांचे ट्विटर हँडल काही काळासाठी बंद कसे करू शकता?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
त्यावर आपली बाजू मांडताना Twitter च्या प्रतिनिधी गटाने म्हटले आहे की अमित शहा यांचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी 'अनावधानाने बंद' झाले होते आणि लक्षात येताच त्यात तत्काळ दुरुस्ती करण्यात आली होती.
ट्विटरकडून अमित शाह यांचे ट्विटर डिस्प्ले पिक्चर कॉपीराइट धारकाच्या तक्रारीवरून काढण्यात आले होते.
काही सदस्यांनी ट्विटरवरील कंटेंट काढून अकाऊंट बंद करण्यासंदर्भात प्रश्न विचारले, तसेच असे करण्याचे कारण काय असे सवाल केले. त्यावर कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांना 'Healthy Platform' तयार करू इच्छित असल्याचे सांगितले.
मात्र कंपनीच्या सदस्यांनी दिलेल्या उत्तरांनी भाजप सदस्यांचे फारसे समाधान झाले नाही. काही जणांचे अकाउंट बंद करतात आणि काही तसेच सोडतात असा नाराजीचा सूर असल्याचे एका सदस्याने सांगितेल.
तसेच स्थायी समितीच्या सदस्यांनी ट्विटरवर देशाचा नकाशा चुकीचा दाखवल्या प्रकरणी नाराजी व्यक्त करत तक्रार देखील केली.