Tuesday, 05 Nov, 5.25 am सामना

ठळक बातम्या
.अन् सौरव गांगुलीने मानले आभार

प्रदूषीत वातावरणामुळे नवी दिल्लीत शुक्रवारपासून हेल्थ इमर्जन्सी घोषित केलेली होती . मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही रविवारी पहिला टी-20 क्रिकेट सामना खेळल्याबद्दल 'बीसीसीआय'चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हिंदुस्थान व बांगलादेश या दोन्ही संघांचे आभार मानले.

गांगुलींनी ट्विटरवरून ही आभाराची पोस्ट 'टीम इंडिया'चा कर्णधार रोहित शर्मा व बांगलादेश क्रिकेट बोर्डाला टॅग करून शेअर केली . दिल्लीतील प्रदूषीत हवेची गुणवत्ता एक्यूआय लेव्हल 1000 च्याही पुढे गेलेली होती . त्यामुळे हा सामना इतरत्र स्थलांतरित करण्याबाबत चर्चा सुरू होती . मात्र इतक्या कमी कालावधीत सामना दुसरीकडे हलविणे शक्य नसल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले होते . प्रदूषीत हवामानामुळे दिल्लीतील शाळा - महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे .

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top