Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
.अन् यूपी पोलिसाने मैदान सोडले

.अन् यूपी पोलिसाने मैदान सोडले

सामना 0 months ago

त्तर प्रदेश पोलीस दलात उप पोलीस अधीक्षक (डीएसपी) म्हणून सेवेत असलेला राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आयोजक आणि संघटनेची नजर चुकवून दक्षिण-मध्य रेल्वे संघातून खेळत होता. त्याने पहिल्या साखळी लढतीत तुफानी चढाया करत आपल्या संघाला विजयही मिळवून दिला.

मात्र त्याच्या या बनवाबनवीची मुंबईच्या प्रतिस्पर्धी संघांना खबर लागताच त्यांनी स्पर्धेचे निरीक्षक असलेल्या विश्वास मोरे यांच्याकडे तक्रार केली. कबड्डीच्या बाबतीत नेहमीच सतर्क असलेल्या मोरे यांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेत संबंधित खेळाडूची सर्व माहिती घेतली.

सरकारी नोकरीत कायमस्वरूपी असलेला खेळाडू दुसऱ्या कोणत्याही संघातून खेळू शकत नाही, या नियमाची बनवाबनवी करणाऱ्या खेळाडूला माहिती देताच तो घाबरला आणि त्याने ओएनजीसीविरुद्ध असलेला साखळी सामना न खेळताच मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो तत्काळ स्वगृही परतला. महाराष्ट्राबाहेरील राज्यात कोणताही खेळाडू कोणत्याही संघातून खेळतो. याबाबत कुणीही काहीही करत नाही. मात्र कबड्डीशी प्रामाणिक असलेल्या महाराष्ट्रात अशी बनवाबनवी चालत नसल्याचे स्पर्धा निरीक्षक विश्वास मोरे यांनी दाखवून दिले. त्यामुळे भविष्यात संघ बदलाची बनवाबनवी करण्याचे धाडस कोणीही दाखवणार नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana