अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलमुळे फसवणूक झाल्याच्या आजवर आपण अनेक घटना ऐकल्या आहेत. त्यामुळे बहुतेक जण अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल उचलणे टाळतात. वारंवार फोनवर येणाऱया याच अनोळखी कॉलमुळे मात्र ऑस्ट्रेलियातील एका महिलेचे भाग्य उजळले आहे. या महिलेला तब्बल अकरा कोटी रुपयांचा जॅकपॉट लागल्याची आनंदवार्ता देणारा हा फोन होता.
झाले असे की, ऑस्ट्रेलियातील तास्मानियामध्ये राहणाऱया एका महिलेला वारंवार अनोळखी नंबरवरून कॉल येत होते. स्क@मर्सचे कॉल्स असतील म्हणून तिने हे फोन उचलणे टाळले. अनेकदा फोन कट करूनही तिला वारंवार फोन येऊ लागले. शेवटी वैतागून महिलेने आपल्याला विनाकारण कोण त्रास देतोय हे जाणून घेण्यासाठी फोन उचलला.

