Dailyhunt
अंतराळातून दिसले पृथ्वीचे मोहक रूप, नासाच्या Artemis II मोहिमेतील अंतराळवीरांनी टिपले खास फोटो

अंतराळातून दिसले पृथ्वीचे मोहक रूप, नासाच्या Artemis II मोहिमेतील अंतराळवीरांनी टिपले खास फोटो

सामना 2 weeks ago

मेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ने (NASA) आपल्या ऐतिहासिक आर्टेमिस-२ (Artemis II) मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी टिपलेली पृथ्वीचे खास फोटो प्रसिद्ध केले आहेत. मिशन कमांडर रीड वाइसमन यांनी त्यांच्या वैयक्तिक टॅबलेटवरून ही प्रकाशचित्रे काढली असून, यामध्ये आपली पृथ्वी अत्यंत विलोभनीय रूपात पाहायला मिळत आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या फोटोत सूर्य पृथ्वीच्या मागे लपताना दिसत आहे. या खास क्षणी पृथ्वीच्या वरच्या उजव्या बाजूला आणि खालच्या डाव्या बाजूला अत्यंत सुंदर ओरोरा (उत्तरी प्रकाश) पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर खालच्या उजव्या बाजूला चमकदार Zodiacal Light ची एक पट्टीही स्पष्टपणे दिसत आहे. नासाच्या मिशन कंट्रोलने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे की, “आपण कितीही दूर गेलो, तरी आपण सर्व एकाच जगाचा भाग आहोत.”

या मोहिमेतील मिशन स्पेशालिस्ट क्रिस्टीना कोच यांनी आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले की, “संपूर्ण पृथ्वीला एकाच वेळी खिडकीतून पाहणे हा अनुभव थक्क करणारा होता. दिवसा उजेडात चमकणारी पृथ्वी, रात्रीचे चांदणे आणि सूर्यास्ताच्या मोहक किरणांच्या दृश्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.” आता चंद्राचेही असेच जवळून दर्शन घडणार असल्याने सर्व अंतराळवीर कमालीचे उत्साही आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana