Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अर्जेंटिनाची जादू संपली! आंतरराष्ट्रीय स्तरावरून लिओनेल मेस्सीची निवृत्ती

अर्जेंटिनाची जादू संपली! आंतरराष्ट्रीय स्तरावरून लिओनेल मेस्सीची निवृत्ती

सामना 1 week ago

पल्या अविस्मरणीय खेळाने तमाम क्रीडा विश्वाला स्वर्गीय आनंद देणारा, आपल्या जादुई पदलालित्यांनी डोळय़ाचे पारणे फेडणाऱ्या अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सीने निवृत्ती जाहीर केली.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये आपण खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले असले तरी क्लबमधून मात्र खेळणार आहे. त्याने सोमवारी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही घोषणा केली. मेस्सीने स्पष्ट केले की, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून पराभव झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्याने हा निर्णय घेतला होता, पण वडिलांच्या निधनानंतर अखेर सोमवारी त्याने या निर्णयाची घोषणा केली आहे. फुटबॉलमधील अर्जेंटिनाची जादू संपली, अशी चर्चा क्रीडाविश्वात सुरू झाली आहे..

निवृत्ती झुगारून गेल्या विश्वचषकात मेस्सी दाखल होता आणि आपल्या जोरावर त्याने अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. मेस्सीचा हा यंदाचा अखेरचा विश्वचषक असल्याचे जगजाहीर होते. त्यामुळे यंदाही तो आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकवून देईल, अशी चाहत्यांना आशा होती; पण स्पेनविरुद्धच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि विश्वचषक पटकावण्याचे त्याचे स्वप्न भंग पावले.

मेस्सी नेमकं काय म्हणाला

मेस्सी म्हणाला की, 'हा निर्णय त्याच्यासाठी अत्यंत कठीण आणि वेदनादायी आहे. अंतिम सामन्याला बराच वेळ लोटला आहे. खूप विचारानंतर मला सर्वांना कळवायचे आहे की, मी राष्ट्रीय संघातून निवृत्त होत आहे. हा एक असा निर्णय होता, ज्यामुळे मला वेदना झाल्या आणि अजूनही खूप वेदना होत आहेत. पण मला वाटते की, हीच योग्य वेळ आहे. मी देशाच्या जर्सीसाठी नेहमीच माझे सर्वस्व दिले आहे. केवळ गेल्या काही वर्षांतच नाही, जेव्हा आम्ही सर्व काही जिंकले तर त्याआधीही मी नेहमीच लढलो आणि माझे सर्वोत्तम दिले. जेणेकरून तुम्ही आनंदी राहू शकाल आणि फुटबॉलच्या माध्यमातून तुम्हाला अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटावा.'

मेस्सीने पुढे लिहिले आहे की, 'माझ्या कारकिर्दीतील काही अध्याय संपत आहेत. हा एक असा अध्याय आहे, जो वेदनादायी आहे. मला अर्जेंटिनाच्या संघाचा भाग व्हायला खूप आवडले. आता निवृत्तीनंतरही मी संघाच्या भल्यासाठी नेहमीच उपलब्ध असेन. माझ्याकडे जे काही होते ते मी दिले आहे. आता माझ्याकडे देण्यासारखे काहीही उरलेले नाही. देशामधून काही उत्कृष्ट तरुण खेळाडू पुढे येत आहेत, जे त्यांच्या संधीसाठी पात्र आहेत.'

देशासाठी खेळेन की नाही ही शंका होती

वडिलांच्या निधनानंतर मेस्सीने एका पोस्टमध्ये लिहिले की, तो अर्जेंटिनासाठी जास्त काळ खेळू शकेन की नाही याबद्दल त्याला शंका होती. स्पेनविरुद्धच्या विश्वचषक अंतिम सामन्यातील आपल्या कामगिरीबद्दलही त्याने लिहिले होते की, 'माझे पाय आता हलू शकत नव्हते. यावेळी मी माझ्या शारीरिक मर्यादांच्या पलीकडे स्वतःला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण मी ते करू शकलो नाही. अंतिम सामन्यानंतर दोन दिवसांनी मी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. वडिलांसोबतच्या घटनेमुळे मी या निर्णयाबद्दल अधिकच दृढनिश्चयी झालो.'

विक्रमांची कारकीर्द

लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अतुलनीय आहे. तो अर्जेंटिनाचा सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू (207 सामने) आणि सर्वाधिक गोल करणारा खेळाडू (125 गोल) आहे.

विश्वचषक ट्रॉफी (2022): 2022 च्या कतार विश्वचषकात सात गोल करून त्याने अर्जेंटिनाला 36 वर्षांनंतर विश्वविजेतेपद मिळवून दिले.

कोपा अमेरिका विजेतेपद: अर्जेंटिनाला मेस्सीने 2021 आणि 2024 मध्ये दोन कोपा अमेरिका विजेतेपद मिळवून दिले.

सहा विश्वचषक स्पर्धा: ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला.

सिल्व्हर बॉल आणि विक्रम: मेस्सीने 2026 च्या विश्वचषकात आठ गोल आणि चार असिस्टसह सिल्व्हर बॉल जिंकला. त्याच स्पर्धेत त्याने मिरोस्लाव्ह क्लोझचा 16 गोलांचा विक्रम मोडला आणि काही काळासाठी विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा किताब आपल्या नावावर केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana