Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
असं झालं तर. घरबसल्या ई-चलान स्टेटस चेक करा

असं झालं तर. घरबसल्या ई-चलान स्टेटस चेक करा

-चलान लागल्याचा मेसेज आल्यानंतर ते चलान तुम्हाला नेमकं कधी आणि कोणत्या कारणासाठी लागलं आहे हे घरबसल्या तपासू शकता.

ई-चलानचं स्टेटस चेक करू शकता तसंच तुम्हाला लागलेला दंड पोलीस स्टेशन किंवा परिवहन कार्यालयात चकरा न मारता भरू शकता.

सर्वप्रथम echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. वेबसाइटवरील Check Challan Status या पर्यायावर क्लिक करा.

चलान नंबर, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबरचा पर्याय दिसेल. तिथे वाहन नंबरच्या पर्यायावर क्लिक करून रजिस्टेशन नंबर टाका.

‘Get Detail’ या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला चलान कधी व कोणत्या कारणासाठी लागलं ते कळेल. तेथूनच ऑनलाइन चलान भरू शकता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana