Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
असं झालं तर. इंटरनेट डेटा लवकर संपतोय.

असं झालं तर. इंटरनेट डेटा लवकर संपतोय.

सामना 1 week ago

1 मोबाईल डेटा पटकन संपल्याची तक्रार अनेक युजर्सकडून ऐकायला मिळते. काही स्मार्ट ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा डेटा बचत करू शकता. इंटरनेटचा आनंद अखंड घेऊ शकता.

2 अनेकदा पह्नमधील अॅप्स वायफायशिवायही आपोआप अपडेट होत असतात.

हे टाळण्यासाठी प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमध्ये जाऊन 'ऑटो अपडेट' बंद करा.

3 एंड्रॉइड किंवा आयओएसच्या सेटिंग्समध्ये जाऊन बॅकग्राऊंड डेटा 'रिस्ट्रिक्ट' किंवा 'ऑफ' करा. यामुळे डेटा फक्त ते अॅप तुम्ही प्रत्यक्ष वापरत असतानाच खर्च होईल.

4 यूटय़ूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या अॅप्समध्ये 'डेटा सेव्हिंग मोड' ऑक्टिवेट करा व व्हिडीओ क्वालिटी 480पी किंवा त्यापेक्षा कमी करा.

5 एंड्रॉइड स्मार्टपह्न्समध्ये 'डेटा सेव्हर' नावाचा एक इनबिल्ट फीचर असतो. हा मोड चालू करून तुम्ही इंटरनेट ब्राऊजिंग करतानाही डेटा वाचवू शकता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana