Dailyhunt
असं झालं तर.  खूप जुना जन्म दाखला काढायचा असेल तर.

असं झालं तर. खूप जुना जन्म दाखला काढायचा असेल तर.

सामना 1 week ago

जुना जन्म दाखला शोधण्यासाठी, तुमच्या जन्माच्या ठिकाणानुसार स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी (उदा. ग्रामसेवक) संपर्क साधा.

'आपले सरकार' पोर्टलवरून ऑनलाईन किंवा संबंधित कार्यालयात ऑफलाईन अर्ज करून जन्म दिनांक, ठिकाण आणि हॉस्पिटलची माहिती देऊन हा दाखला मिळवू शकता.

अर्जामध्ये ज्याचा जन्म दाखल काढायचा आहे, त्याची जन्माची तारीख, जन्माचे ठिकाण (हॉस्पिटलचे नाव), आई-वडिलांची नावे यांसारखी माहिती अचूक भरावी.

जर नोंद ग्रामपंचायतीत किंवा नगरपालिकेत सापडली नाही, तर तुम्हाला 'उशिराने नोंदणी' (डिले रेजिस्ट्रेशन) प्रक्रियेद्वारे नवीन दाखला मिळवता येईल.

शाळा सोडल्याचा दाखला, हॉस्पिटल रेकॉर्ड द्यावे. जन्म हॉस्पिटलमध्ये झाला नसेल, तर पंचनामा किंवा सरपंचांची साक्ष यांसारखे पुरावे सादर करावे लागू शकतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana