मोबाईल बँकिंग अॅपचा पिन नंबर विसरल्यास काळजी करू नका. तुम्ही तो घरबसल्या काही मिनिटांत रिसेट करू शकता. फॉरगॉट पिनचा पर्याय वापरा.
बँकिंग अॅपवर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर व्हेरिफाय करा.
बहुतेक बँका पिन रिसेट करण्यासाठी एटीएम कार्डची माहिती मागतात.
तुमच्या डेबिट कार्डचा नंबर, एक्सपायरी डेट आणि एटीएम पिन टाका. माहिती पडताळणीनंतर (व्हेरिफिकेशन) तुम्ही नवीन पिन सेट करू शकता.
जर तुमच्याकडे नेट बँकिंगचे युजर आयडी आणि पासवर्ड असेल, तर तुम्ही त्याद्वारेही नवीन एम पिन तयार करू शकता.
अॅपच्या प्रकारानुसार पद्धत वेगळी असू शकते.
यापैकी कोणतीही पद्धत काम करत नसेल तर जवळच्या बँक शाखेत जाऊन 'पिन रिसेट'चा अर्ज भरा. नवीन पिन सेट करताना जन्मतारीख, मोबाईल नंबर ठेवू नका.

