Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
असं झालं तर. मोबाईल डेटा लवकर संपत असेल तर

असं झालं तर. मोबाईल डेटा लवकर संपत असेल तर

सामना 1 day ago

1 मोबाईलवर आजकाल रील्स आणि व्हिडीओ बघण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोबाईलचा डेटा कधी संपतो हे कळतच नाही. त्यामुळे डेटा पॅक सतत रिन्यू करावा लागतो. 2 व्हॉट्सअॅप, यूटय़ूब, इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादी सोशल मीडिया अॅपचा वापर वाढल्यामुळे डेटा लवकर संपतो.

काही सेटिंग्स केल्यास डेटा पॅक लवकर संपणार नाही.
3 बहुतांश स्मार्टफोनमध्ये डेटा सेव्हर मोड असतो. ते ऑन करा. यामुळे बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अॅप डेटा वापरत नाहीत. त्यामुळे डेटा कमी वापरला जातो.
4 गुगल प्ले स्टोअरमध्ये ऑटो अपडेट अॅप्स ही सेटिंग बंद करा. यामुळे मोबाईल अॅप्स तुमच्या सवडीने अपडेट करता येतील. वाय-फायने तुम्हाला हे अपडेट करता येतात.
5 व्हॉट्सअॅपमध्ये युझलेस डेटा फॉर कॉल अशी एक सेटिंग आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपवरून का@ल करत असाल तर या सेटिंगमुळे तुमचा मोबाईल डेटा कमी वापरला जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana