Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
असं झालं तर. मुदत संपण्यापूर्वी एफडीमधून पैसे काढल्यास?

असं झालं तर. मुदत संपण्यापूर्वी एफडीमधून पैसे काढल्यास?

सामना 22 hrs ago

चांगली बचत करण्यासाठी बँक एफडी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. एफडीत गुंतवणूक करताना सर्वप्रथम त्याचा कार्यकाळ विचारात घेणे आवश्यक आहे.

मुदत संपण्यापूर्वी एफडीमधून पैसे काढल्यास 1 टक्केपर्यंत दंड भरावा लागतो.

ज्यामुळे ठेवींवर मिळणारे एकूण व्याज कमी होते.

बऱयाच बँका प्री-मॅच्युअर विड्रॉलवर 0.5% ते 1.5% पर्यंत दंड आकारतात. एफडी केल्यापासून 7 दिवसांच्या आत पैसे काढले, तर कोणतेही व्याज मिळत नाही.

टॅक्स सेव्हर एफडीमध्ये 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. मुदत संपण्यापूर्वी पैसे काढता येत नाहीत. एफडी मोडण्याऐवजी 'ओव्हरड्राफ्ट' किंवा 'स्वीप-इन' सुविधा घेऊ शकता.

एफडी मोडताना होणारे नुकसान आणि दंड प्रत्येक बँकेच्या नियमांनुसार वेगवेगळा असू शकतो? अधिक अचूक माहितीसाठी तुम्ही तुमच्या बँक शाखेला भेट द्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana