1 EPFO च्या कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध नागरिकांना पेन्शन जमा झाली की नाही? हे पाहण्यासाठी आता कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.
2 घरबसल्या EPFO च्या अधिपृत वेबसाईटवरील ‘PPO Enquiry’ सेक्शनमध्ये जाऊन आपल्या पेन्शनचा संपूर्ण लेखाजोखा आणि पेमेंटचे डिटेल्स ऑनलाईन पाहू शकता.
3 ऑनलाईन पेन्शन ट्रॅकिंग सुविधेचा वापर करण्यासाठी पेन्शनधारकांकडे त्यांचा 'पेन्शन पेमेंट ऑर्डर' म्हणजेच PPO नंबर असणे आवश्यक आहे.
4 epfo.gov.in या अधिपृत वेबसाइटच्या होम पेजवर पेन्शनरवर जा. लॉगिन पर्यायावर क्लिक करा. डाव्या बाजूला PPO चौकशी / पेमेंट चौकशी पर्यायावर क्लिक करा.
5 पोर्टलवर लॉगिन करून दरमहा खात्यात जमा होणारी पेन्शन रक्कम, मागील पेमेंटचा इतिहास आणि इतर तांत्रिक तपशील थेट स्क्रीनवर तपासू शकता.

