1 यूपीआयमुळे सहज आणि सोप्या पद्धतीने व्यवहार होत असल्याने आजकाल प्रत्येक लहान-मोठय़ा व्यवहारासाठी यूपीआय पेमेंटचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो.
2 पेमेंट करताना अनेकदा तुमचा मोबाईल नंबर अनोळखी व्यक्तींसोबत शेअर होतो, ज्यामुळे प्रायव्हसीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.
3 UPI ट्रान्झॅक्शन दरम्यान स्वतःचा फोन नंबर गुप्त ठेवण्यासाठी युजर्स कस्टमाईज्ड यूपीआय आयडी (Custom UPI ID) चा वापर करू शकतात.
4 पेटीएमवर तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर जा, तेथे UPI आणि पेमेंट सेटिंग्ज निवडा, Manage UPI ID वर क्लिक करा आणि कोणतेही नाव वापरून आयडी तयार करा.
5 गुगल पेवर प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा, बँक खाते निवडा आणि मॅनेज UPI नंबर वर जाऊन मोबाईल नंबर अन-लिंक करण्याची प्रोसेस करा.

