Thursday, 08 Apr, 1.04 pm सामना

ठळक
बाबो! लॉन्च होताच अवघ्या 10 सेकंदात 113 कोटींच्या स्मार्टफोनची विक्री, जाणून घ्या.

जगभरात रोज नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होत असतात. मात्र यातील काहींना ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो. स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने आपला नवीन स्मार्टफोन Realme GT Neo नुकताच चीनमध्ये लॉन्च केला. लॉन्च होताच ग्राहक यावर तुटून पडले आणि अवघ्या 10 सेकंदामध्ये 100 मिलियन युआन (जवळपास 113 कोटी रुपये) ची उलाढाल झाली.

Realme GT Neo हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील 12 जीबी रॅम असणाऱ्या व्हेरिएन्टची किंमत 2399 युआन (27 हजार रुपये) आहे. यावर कंपनी 100 युआनची सूटही देत आहे.

फिचर्स

- 6.43 इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
- फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप
- 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स
- 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
- 4500mAh ची बॅटरी

दरम्यानस ड्यूल नॅनो सिम सपोर्ट वाला हा फोन अँड्रॉयड 11 वर बेस्ड Realme UI 2.0 वर काम करतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल मोड 5G, ड्यूल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top