Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 131 जनावरांची सुटका; मुस्लिम मोहल्ल्यात पोलिसांचे 6 तास सर्च ऑपरेशन

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 131 जनावरांची सुटका; मुस्लिम मोहल्ल्यात पोलिसांचे 6 तास सर्च ऑपरेशन

सामना 1 week ago

त्रपती संभाजीनगर शहरात बकरी मुस्लिम ईदच्या नावाखाली सर्रास होणाऱ्या मोहल्ल्यात गोवंश हत्या थांबविण्यासाठी पोलिसांचे पवार यांनी खाटकांच्या बैठका ६ तास सर्च घेतल्या होत्या. मात्र, तरीदेखील आज बुधवारी राबविण्यात आलेल्या गोवंशाच्या सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी तब्बल १३१ जनावरांची खाटकांच्या ताब्यातून सुटका केली.

अन्नपाण्याशिवाय मोहल्ल्यातील घरांमध्ये कोंबून ठेवली होती. पोलिसांनी सुटका करताच काही गायींनी वासराला पाहून हंबरडा फोडला.

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असूनदेखील अशाप्रकारे अवैध कत्तल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांना करण्यात आली होती. त्यामुळे आयुक्तालयाच्या हद्दीत बकरी ईदनिमित्त गोवंशाची होणारी अवैध कत्तल थांबविण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील शांतता कमिटीची बैठक पोलीस आयुक्तालयातील सभागृहासह स्थानिक पोलीस ठाण्यात घेण्याचे आदेश दिले होते. पोलीस ठाण्यातदेखील पोलीस निरीक्षकांच्या – अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात आल्या. मात्र, तरीदेखील – गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरे पकडण्यात आली.

मुस्लिम मोहल्ल्यात अचानक तपासणी मोहीम

मुस्लिम मौलवींसह खाटकांसोबत पोलिसांनी बैठका घेतली होत्या. त्यानुसार पोलिसांनी कत्तली करू नका, असे आवाहन केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अनेक ठिकाणी गोवंश घरात बांधून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज बुधवारी दुपारी दोन ते रात्री सात वाजेच्या दरम्यान जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्च ऑपरेशन राबविले. या मोहिमेत जवळपास १३१ जनावरे सापडले. या सर्व जनावरांची सुटका केली.

पोलिसांनी जनावरांना ठाण्यातच केला चारापाणी

कसायाच्या ताब्यातून सोडून आणलेली ही जनावरे जिन्सी पोलीस ठाण्यात घेऊन आल्यानंतर अनेक जनावरे तहानेने व्याकूळ झाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ पाणी उपलब्ध करून अनेक जनावरांची तहान भागविली. तर काही जनावरांना चाऱ्याचीदेखील सोय करण्यात आली होती. पोलीस ठाण्यातील नोंदीनंतर ही जनावरे वेगवेगळ्या गोशाळेत मनपाच्या कोंडवाडा गाडीने पाठविण्यात आली.

अख्खे पोलीस आयुक्तालय जिन्सीत

बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी हाती घेतलेल्या गोवंश सर्च ऑपरेशनला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. जिन्सी पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त प्रवीण पवार ठाण मांडून बसले होते. या कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांसह स्थानिक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी मोठा बंदोबस्त लावला होता. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस निरीक्षकांनी खाटकांना मोठी तंब्बी दिली आहे. त्यात छावणी, क्रांतीचौक, सिटीचौक, बेगमपुऱ्यासह अनेक भागांत खाटकांना ठाण्यात बोलवून कत्तलीबाबत कठोर कारवाईचे संकेत दिले होते. मात्र, पोलीस आयुक्तालयाच्या सर्च ऑपरेशनमध्ये जिन्सीच्या हद्दीतच १३१ जनावारे सापडल्याने या पोलीस ठाण्याच्या कारभरावर प्रश्च चिन्हे उपस्थित केली जात आहेत. या मोठ्या कारवाईनंतर स्थानिक पोलीस ठाणेप्रमुखांबाबत पोलीस आयुक्त काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

८ जणांविरुद्ध गुन्हा; मकोकाअंतर्गत कारवाई करणार

जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १३१ जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी ८ जणांविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात ४ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana