Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बकरी ईदनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

बकरी ईदनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

सामना 1 month ago

मुंबई शहरात बकरी ईदच्या निमित्ताने मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. 8 अप्पर आयुक्त, 21 पोलीस उपायुक्त, 61 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1980 पोलीस अधिकारी आणि 10110 पोलीस अंमलदार तैनात असणार आहेत.

तर आज पोलिसांनी शहरात विविध भागांत रूट मार्च केला.

गुरुवारी शहरात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. बकरी ईद दरम्यान काही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. ईदच्या दिवशी मुंबईत पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. 8 अप्पर आयुक्त, 21 पोलीस उपायुक्त, 61 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1980 पोलीस अधिकारी आणि 10110 पोलीस अंमलदार, त्यासोबत राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, डेल्टा कॉम्बॅट, होमगार्डचे जवान तैनात केले जाणार आहेत. आज शहरातील काही भागांत मुंबई पोलिसांनी रूट मार्च केला. तर काही संवेदनशील भागांत पोलीस सीसीटीव्ही पॅमेऱयांच्या माध्यमातून लक्ष ठेऊन असणार आहेत. सोसायटय़ांमध्ये पुर्बानीवरून वाद होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाणार आहे. हाजीअली दर्गा येथे मोठय़ा संख्येने नागरिक येणार असल्याने तेथे पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana