Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बलात्काराची तक्रार केल्याने बिहारमध्ये महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा

बलात्काराची तक्रार केल्याने बिहारमध्ये महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा

सामना 6 days ago

लात्काराची तक्रार दाखल केल्याने एका महिलेला पंचायतीसमोर जमिनीवरील थुंकी चाटण्यास लावले. बिहारमधील बेगुसराय येथे ही घटना घडली. ही घटना जूनमध्ये घडल्याचे सांगितले जात असून, आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

आरोपीने खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी त्याला पकडले. मात्र, पोलिसांना माहिती देण्याऐवजी ग्रामस्थांनी पंचायत बोलावली आणि दोघांनाही सार्वजनिकरीत्या अपमानित केले, असा आरोप महिलेने आरोप केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला ती महिला पंचातीच्या मध्यभागी कान धरून उभी असल्याचे दिसते. त्यानंतर तिला जमिनीवरील थुंकी चाटण्यास लावले जाते. दरम्यान, गावकऱयांनी आता या घटनेबाबत वेगळाच दावा केला आहे. सदर महिला आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आले होते, असे गावकऱयांचे म्हणणे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana