Dailyhunt
बंगळुरू विमानतळावर पाच कोटींचे सोने जप्त

बंगळुरू विमानतळावर पाच कोटींचे सोने जप्त

सामना 3 weeks ago

बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3.356 किलोचे सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत तब्बल 5 कोटी रुपये इतकी आहे. विमानतळाच्या टर्मिनल-2 वर तस्करीचे सोने येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.

हे सोने पेस्ट करून लपून आणले जात होते. तस्कर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा यासाठी वापर करत होते. विमानतळाच्या आत गुप्त पद्धतीने सोने एक दुसऱयाकडे सोपवत होते. यासाठी खास कोडवर्ड वापरले जात होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana