Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बारावीचा उद्या निकाल, सकाळी 11 वाजता जाहीर, 1 वाजता ऑनलाइन

बारावीचा उद्या निकाल, सकाळी 11 वाजता जाहीर, 1 वाजता ऑनलाइन

सामना 1 month ago

हाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी 2 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वा.पासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येईल.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. सकाळी 11 वाजता शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्याचा निकाल, कोणत्या विभागात किती निकाल आणि एकूण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निकालाची तपशिलवार आकडेवारी जाहीर होईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना mahahsscboard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

'आयसीएसई'चा निकाल जाहीर

'आयसीएसई' शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दहावीचा निकाल 99.18 टक्के आणि बारावीचा निकाल 99.13 टक्के लागला आहे. निकालांमध्ये नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून दहावीत 99.46 टक्के तर बारावीत 99.48 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.

महाराष्ट्राचा दमदार निकाल

महाराष्ट्रातून दहावीमध्ये 30 हजार 393 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 30 हजार 372 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण 99.93 टक्के एवढे आहे, तर इयत्ता बारावीत 4 हजार 61 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 99.86 टक्के एवढे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana