Thursday, 05 Sep, 9.38 am सामना

ठळक बातम्या
बायकोचा छळ करणाऱ्या सासूचा नवऱ्याने केला खून

कल्याणमध्ये राहणाऱ्या अमन मुल्ला (वय 28 वर्षे) नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:च्या आईची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची आई तिच्या सुनेला म्हणजेच अमनच्या बायकोचा छळ करत होती.

मुल्ला कुटुंब हे कल्याण पश्चिमेच्या भोईरवाडीमधल्या गफूर पॅसेलमध्ये राहात होतं. अमनचा आई रुक्साना मुल्ला (वय-56 वर्ष) ही तिच्या सुनेचा म्हणजेच अमनच्या बायकोचा छळ करत होती. रुक्साना आणि अमनचं काही कारणावरून भांडण झालं, यामुळे संतापलेल्या अमनने पहिले प्रेशर कुकरने आणि नंतर हाताला लागेल त्या वस्तूने आईला मारहाण केली. या मारहाणीत रुक्साना यांचा मृत्यू झाला. अमन आईला मारत असताना अमनच्या मोठ्या भावाची बायको आणि मुलं घाबरून घराबाहेर पळाली. त्यांनी शेजाऱ्यांना अमन त्याच्या आईला मारहाण करत असल्याचं कळवलं. शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं, मात्र तोपर्यंत रुक्साना यांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top