Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भल्या पहाटे चोरी करणाऱ्या बहिणी जेरबंद

भल्या पहाटे चोरी करणाऱ्या बहिणी जेरबंद

सामना 1 week ago

ल्या पहाटे घरांची रेकी करायची. ज्या घराचा दरवाजा उघडा दिसेल त्या घरातील किमती ऐवज चुटकीसरशी उचलून परागंदा व्हायचे. अशा प्रकारे चोऱया करणाऱया दोघा बहिणींना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.

बोरिवली पूर्वेकडील दौलत नगरातील मंगलम सोसायटीच्या तळमजल्यावर प्रियांका पुरोहित (25) या राहतात. इतर शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात व्यक्तीने आत घुसून टेबलावरील दोन मोबाईल व सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही बाब कळताच पुरोहित यांनी तक्रार दिल्यावर कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. सपोनि राहुल पाटील, मुजावर, सवळी, पुजारी, पह्पसे, सकपाळ या पथकाने घटनास्थळ व परिसरातील 50 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेतला असता आरोपी मनीषा मारवाडी (21) आणि सरगम मारवाडी (20) या दोघी बहिणी असल्याचे निष्पन्न झाले. मग खबऱयांच्या मदतीने त्या दोघींना नालासोपारा पश्चिमेकडून उचलण्यात आले.

दरवाजा उघडा असणाऱ्या घरात हातसफाई

सकाळच्या सुमारास घराचा उघडा दरवाजा बघून चोरी करण्यात मनीषा आणि सरगम या बहिणी सराईत आहेत. या दोघींच्या विरोधात अन्य पोलीस ठाण्यांतदेखील विविध गुन्हे दाखल आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana