Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बॉडी शेमिंगच्या वादावर कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, मांडले स्पष्ट मत

बॉडी शेमिंगच्या वादावर कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, मांडले स्पष्ट मत

सामना 2 hrs ago

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या बॉडी शेमिंगच्या वादावरून चर्चेत आहे. गणेशोत्सवादरम्यान कतरिनाने अंबानी यांच्या घरी हजेरी लावली होती त्यानंतर काही युजर्सनी तिचे प्रेग्नेंसीपूर्वीचे आणि नंतरचे फोटो शेअर करत तिच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

या ट्रोलिंगच्या काळात अली जफर, सोनारिका भदौरिया आणि शिवालिका ओबेरॉय यांसारख्या अनेक बॉलिवुड कलाकारांनी कतरिनाला पाठिंबा दिला.

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर, कतरिनाने एका मुलाखतीदरम्यान आई झाल्यानंतर तिच्या त्वचेमध्ये झालेल्या बदलांवर आणि सौंदर्याविषयीच्या तिच्या बदललेल्या दृष्टिकोनावर तीने स्पष्ट मत मांडले आहे. ती म्हणाली की, गरोदरपणानंतर माझी त्वचा आणखीनच संवेदनशील झाली. तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. कारण माझ्या त्वचेसाठी कोणते प्रोडक्ट योग्य आहेत हे मला ठरवावे लागत होते. मी अशा प्रोडक्टच्या शोधात होते, जी माझ्या त्वचेला आराम देतील, शांत करतील आणि ताजेपणा देतील.

कतरिनाने पुढे स्पष्ट केले की, चित्रपटसृष्टीत आणि मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या काळात सौंदर्याचे काही ठरलेले निकष होते. परंतु आता तिच्यासाठी सुंदर दिसण्याचा अर्थ केवळ बाह्य देखावा नसून आतून स्वतःला प्रसन्न व निरोगी वाटणे हा आहे. योग्य आहार घेणे, शरीराची काळजी करणे, मेडीटेशन करणे, सकाळी उठल्यावर फोनपासून दूर राहून नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवणे या गोष्टींमुळे तिला मोठा फरक जाणवतो. जेव्हा माणूस आतून निरोगी आणि आनंदी अनुभवतो, तेव्हा त्याचा आत्मविश्वास आपोआप चेहऱ्यावर दिसून येतो, असे मत तिने व्यक्त केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana