Friday, 07 May, 6.27 pm सामना

ठळक
Breaking - डॉन अभी जिंदा है! अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाले होते. मात्र, दिल्लीतील एम्स रुग्णालय आणि तिहार तुरुंग प्रशासनाने या वृत्ताचे खंडन केले आहे. या वृत्तात सत्यता नसून ती अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. छोटा राजनचा मृत्यू झाला नसून त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

छोटा राजन तिहार तुरुंगात आजीवन तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. या तुरुंगातच त्याला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्याला संक्रमण झाल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी अनेक प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीयावर छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले.

हे वृत्त खोटे असून राजनवर उपचार सुरू असल्याचे एम्स रुग्णालय आणि तिहार तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे छोटा राजनच्या मृत्यूचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. छोटा राजनवर अपहरण आणि खूनासह 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवून त्याला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कुख्यात डॉन दाओऊद इब्राहिम याचा राजन निकडचा साथीदार होता. मात्र, नंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top