Sunday, 19 Jan, 7.01 pm सामना

देश
ब्युटी पार्लरमध्ये सुरू होता 'नंगा'नाच, पोलिसांनी 11 तरुणींना रंगेहात पकडले

ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटरमध्ये 'नको ती कामं' होत असल्याचा अनेकदा पर्दाफाश झाला आहे. अशाच एका ब्युटी पार्लमध्ये शरीर विक्री व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकून 11 तरुणींना रंगेहाथ पकडले आहे. भर वस्तीमध्ये सुरू असलेला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांसह आजूबाजूच्या लोकांनाही धक्का बसला आहे.

मुंबई पोलिसांची धडक कारवाई, 2 अभिनेत्रींनंतर दिग्दर्शकाला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी शहर मध्य भागातील ब्युटी पार्लरमध्ये छापा टाकला. निवासी क्षेत्राच्या ब्युटी पार्लरमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. या छाप्याचा एक भाग म्हणून बंगाल अंबुजातील एका खासगी ब्युटी पार्लरमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटच्या आरोपाखाली 11 महिला आणि एका पुरुषाला रंगेहाथ पकडले. याशिवाय पोलिसांनी अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. या कारवाईदरम्यान एसीपी कंकसा संदीप कारा, महिला पोलीस अधिकारी आणि गुप्तचर विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये पकडलेल्या अभिनेत्रीचा बिग बॉस स्पर्धकावर गंभीर आरोप

असा रचला सापळा
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना ब्यूटी पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळत होती. यानंतर आयुक्तालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी अंबुजा परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये छापा टाकला. यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि ग्राहक असल्याचे नाटक केले. पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये ग्राहक म्हणून पार्लरमध्ये पहिले दोन पोलिसांना पाठवले. त्यानंतर, साध्या कपड्यातील पोलीस ब्युटी पार्लरमध्ये त्यांच्या कारवायांची माहिती घेण्यासाठी गेले, त्याचवेळी अधिकाऱ्यांना संशय होताच माहिती मिळाली आणि त्यांनी सगळ्यांना तब्यात घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top