Thursday, 23 Sep, 7.24 pm सामना

ठळक
चंद्रपुरातील शेतकऱ्याचा ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग

चंद्रपूर जिल्ह्यात कृषी क्षेत्रात फार नवे बदल झालेले अभावानेच दिसून आले. जे काही झाले, ते मर्यादित स्वरूपाचे. मोठा फायदा असूनही शेतकरी पारंपरिक पिकांनाच प्राधान्य देतात. पण शेतकरी नवे प्रयोग करतात, त्यांचे नाव आणि फायदाही झालेला दिसून आले आहे. याच मालिकेत आता राजुरा येथील शेतकरी कवडू बोढे यांचा समावेश झालाय. त्यांनी पारंपरिक शेतीसोबतच ड्रॅगन फ्रुटची शेती करून सर्वांना चकित केले आहे.

कवडू बोढे हे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये नोकरीत होते. त्यांची दोन एकर शेती आहे. 2017 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. जवळच्या दोन एकरांपैकी एका एकरात ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा निर्धार केला. या फळात औषधीय गुणधर्म असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी आहे. पण चांद्रपूरसारख्या उष्ण भागात हे फळ येईल का, हा प्रश्न होता. त्यासाठी कृषी विभाग आणि फळाच्या लागवडीबाबतचा अभ्यास त्यांनी केला. या कामात त्यांचा ग्रामसेवक मुलगा रवी यानेही मदत केली. 2018 मध्ये याची लागवड केली. पाहिले दोन वर्षे जेमतेम पीक आल्यानंतर आता तिसऱ्या वर्षी चांगले उत्पादन हाती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिमेंट पोल, रिंग आणि ठिबक सिंचन आणि सेंद्रिय मिश्र खत यासाठी त्यांना प्रारंभी साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला. मात्र खर्चाच्या तुलनेत मिळणारा नफा शाश्वत असल्याने खर्च निघून नफा मिळू लागला. बाजारात 200 ते 250 रुपये किलोचा भाव असून, चंद्रपूर जिल्ह्यातच त्याची मागणी मोठी आहे. त्यामुळे बाजारपेठेचा मार्गही मोकळा झाला. ड्रॅगन फ्रुटची शेती हा जिल्ह्यासाठी नवा आणि पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याने इतरांसाठी प्रेरणादायीसुद्धा ठरलाय.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top