Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चित्रपट महामंडळ निवडणूक; चित्रकर्मी आणि समर्थ पॅनलमध्ये चुरस  वर्षा उसगावकर, आनंद शिंदे, विजय खोचीकर यांची बिनविरोध निवड

चित्रपट महामंडळ निवडणूक; चित्रकर्मी आणि समर्थ पॅनलमध्ये चुरस वर्षा उसगावकर, आनंद शिंदे, विजय खोचीकर यांची बिनविरोध निवड

सामना 1 week ago

खिल भारतीय मराठी चित्रपट महामडंळाच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. एकूण 60 उमेदवारांपैकी 13 जणांनी अर्ज माघे घेतल्याने 14 जागांसाठी 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्य लढत चित्रकर्मी आणि समर्थ पॅनलमध्ये होणार आहे.

काही अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. अभिनेत्री गटातून वर्षा उसगावकर, गायक गटातून आनंद शिंदे तर संकलन गटातून विजय खोचीकर बिनविरोध निवडून आले आहेत.

चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी आज जाहीर झाली. निवडणूक चिन्हांचेही वाटप झाले. मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी समर्थ पॅनल स्थापन केले आहे. सतीश रणदिवे यांच्या पुढाकाराने चित्रकर्मी पॅनेलची स्थापना झालेली आहे. चित्रकर्मी पॅनलचे निवडणूक चिन्ह कपबशी तर समर्थ पॅनलचे चिन्ह पतंग आहे.

अभिनेत्री गटातून नीलम शिर्के यांनी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने वर्षा उसगांवकर या बिनविरोध निवडून आल्या. तर गायक आनंद शिंदे आणि विजय खोचीकर यांच्या समोर उमेदवारच उभे नव्हते. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध ठरली.

7 जून रोजी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे मतदान होणार आहे. 8 जूनला मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana