Saturday, 06 Mar, 4.46 pm सामना

ताज्या
#CoronavirusUpdate - महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ कायम

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत दैनंदिन कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदविली जात आहे. गेल्या 24 तासांतील नव्या रुग्णसंख्येतील एकूण वाढ 82% इतकी नोंदविली गेली आहे. गेल्या 24 तासांत 18,327 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 10,216 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 2,776 तर पंजाबमध्ये 808 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आठ राज्यांत रुग्णसंख्येत सतत वाढ होत असलेली दिसून येत आहे.

हिंदुस्थनांतील सक्रीय रुग्णांची संख्या आज 1,80,304 वर पोचली आहे. हिंदुस्थनांतील सक्रीय रूग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.61%इतकी आहे.

दुसरीकडे 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 1,000 पेक्षा कमी सक्रिय रूग्ण आहेत. अरुणाचल प्रदेश येथे केवळ 3 सक्रीय रुग्णांची नोंद झाली.

केरळ,छत्तीसगड आणि तामिळनाडू येथे गेल्या 24 तासांत सक्रीय रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. तर त्याच कालावधीत महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरीयाना येथे सक्रीय रूग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.

ज्यांना पहिली मात्रा घेऊन 28 दिवस पूर्ण केले आहेत, अशा लोकांना कोविड-19 ची लसीकरणाची दुसरी मात्रा दिनांक 13 फेब्रुवारी 2021 पासून देण्यास आरंभ झाला. एफएलडब्ल्यूंच्या लसीकरणाला दिनांक 2 फेब्रुवारी 2021पासून आरंभ झाला.

60 वर्षांपेक्षा अधिक आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांना कोविड लसीकरण करण्याच्या दुसऱ्या टप्प्याला दिनांक 1 मार्च 2021 पासून आरंभ झाला.

आतापर्यंत प्राप्त अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत 1.94 कोटीपेक्षा अधिक (1,94,97,704) लोकांना 3,57,478 सत्रांद्वारे लसीची मात्रा देण्यात आली. यात 69,15,661 एचसीडब्ल्यूज (पहिली मात्रा), 33,56,830 एचसीडब्ल्यूज (दुसरी मात्रा) आणि 1,44,191 एफएलडब्ल्यूजना (दुसरी मात्रा) विविध रोग असलेल्या 45 वर्षांहून अधिक वयोगटातील 3,46,758 लोकांना (पहिली मात्रा) तर 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील 23,78,275 (पहिली मात्रा) लोकांना कोविड लसीची मात्रा देण्यात आली.

आज लसीकरण मोहिमेच्या 49 व्या दिवशी (दिनांक 5 मार्च 2021) एकूण 14,92,201लसी देण्यात आल्या. यापैकी 11,99,848 लाभार्थ्यांना एकूण 18,333 सत्रांद्वारे लसीची पहिली मात्रा (एचसीडब्ल्यूज आणि एफएलडब्ल्यूज) देण्यात आली तर आरोग्य कर्मचारी आजी आघाडीवर काम करणाऱ्या 2,92,353 जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top