Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CPL 2026 - नाद करती काय. सीमारेषेवर एका हाताने 'अद्भूत' कॅच घेऊन ग्लेन फिलिप्स स्वत:च झाला शॉक, पहा Video

CPL 2026 - नाद करती काय. सीमारेषेवर एका हाताने 'अद्भूत' कॅच घेऊन ग्लेन फिलिप्स स्वत:च झाला शॉक, पहा Video

सामना 6 days ago

न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स हा आपल्या अफाट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. फलंदाजाने वेगाने मारलेल्या चेंडूवर फिलिप्स चित्त्याच्या चपळाईने झेप घेतो आणि त्याला बाद करतो. आपल्या या अफाट क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडवत त्याने क्रिकेट चाहत्यांना थक्क केले आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने सीमारेषवर एक अद्भूत कॅच घेतला आणि त्यानंतर स्वत:च शॉक झाला. एवढेच नाही तर फलंदाजासह मैदानावरील प्रेक्षकही अवाक झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये ग्लेन फिलिप्स गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्सकडून खेळतो. त्रिनिदाद अँड टोबॅगो विरूद्धच्या सामन्यात त्याने सुनील नारायण याचा सीमारेषेवर अफलातून कॅच घेतला. गयानाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाला अनुभवी खेळाडू सुनील नारायण याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र फिलिप्सच्या दमदार क्षेत्ररक्षणामुळे नारायणला दोन चेंडू खेळून माघारी परतावे लागले.

वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसने टाकलेल्या चेंडूवर नारायणने जोरदार पूल शॉट मारला. चेंडू वेगाने सीमारेषेकडे जात होता. याचवेळी डीप स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्सने डावीकडून उजवीकडे धाव घेतल चपळाईने एका हाताने चेंडू अलगद पकडला. हा कॅच एवढा अविश्वसनीय होता की स्वत: ग्लेन फिलिप्सही काही क्षण अवाक झाला.

हेटमायरचे वादळी शतक

दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना बराच वेळा थांबवण्यात आला होता. दीड तासांहून अधिक वेळ वाया गेल्यानंतर सामना 16 षटकांचा करण्यात आला. त्यानंतर गयानाचा स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायर याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या 40 चेंडूत शतक ठोकले. सीपीएलमधील हे त्याचे दुसरे शतक ठरले. त्याच्या घणाघाती शतकानंतर रोमारियो शेफर्ड यानेही बॅटचा तडाखा दिला. त्यामुळे गयानाला 5 बाद 185 धावांचा डोंगर उभारता आला.

हेल्सचे अर्धशतक, नबीच्या 3 विकेट्स

डकवर्थ ल्युईस नियमानुसार त्रिनिदाद अँड टोबॅगो संघापुढे 16 षटकात 182 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाला निर्धारित षटकांमध्ये 7 बाद 172 धावाच करता आल्या. अ‍ॅलेक्स हेस्लने सर्वाधिक 55 धावा केल्या, तर निकोलस पूरनने 43 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज अपयशी ठरल्याने त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाने हा सामना 9 धावांनी गमावला. गयानाकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana