Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CWG 2026 - हिंदुस्थानसाठी पदकांची पायाभरणी; प्रीती पवारसह अंकुशही अंतिम फेरीत, अ‍ॅथलेटिक्समध्येही दमदार कामगिरी

CWG 2026 - हिंदुस्थानसाठी पदकांची पायाभरणी; प्रीती पवारसह अंकुशही अंतिम फेरीत, अ‍ॅथलेटिक्समध्येही दमदार कामगिरी

सामना 2 weeks ago

हिंदुस्थानने शुक्रवारी पदकांची भक्कम पायाभरणी केल्याचे समोर आले. हिंदुस्थानचे दोन्ही बॉक्सर आता अंतिम फेरीत पोहोचले आहेत, त्यामुळे किमना दोन रौप्यपदकं तरी देशाच्या पदरात पडू शकतात.

अ‍ॅथलेटिक्समध्येही हिंदुस्थानने दमदार कामगिरी करत पदकांची निश्चिती केली आहे.

रोहित मजगुलचाही विजय

रोहित मजगुल ज्युडोच्या ६६ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. रोहित आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा इतका पुढे होता की, हर्ष सिंगप्रमाणेच त्यालाही इप्पॉनने (वेळेआधीच) विजेता घोषित करण्यात आले. श्रद्धा चोप्राही महिलांच्या ५२ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे.

शंकरने स्वतःचाच विक्रम मोडला

शंकरने थाळीफेकीत ४०.४४ सेकंदांची वेळ नोंदवून आपली सर्वोत्तम कामगिरी केली. या कामगिरीमुळे सुवर्णपदकाच्या शर्यतीत त्याचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. तो सध्या डेकॅथलॉनमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

रिले स्पर्धेच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानची नोंद

भारतीय संघाने मिश्र ४४०० मीटर रिले स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. भारतीय खेळाडू विशाल टिक्के, राजेश रमेश, रुषदीप कौर, अन्सा बाबू आणि नीरू पाठक यांनी ३:२०:९८ मिनिटांत ही कामगिरी केली. त्यामुळे आता अंतिम फेरीत ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

प्रीती पवार बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रीती पवारने महिलांच्या ५४ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडाकेबाज विजय मिळवला. प्रीतीने झांबियाच्या वॅ रुथरीन म्वापेचा ५-० असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोनवेळा आशियाई चॅम्पियन ठरलेली प्रीती आता सुवर्णपदकाच्या लढतीत कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोचा सामना करणार आहे.

अंकुश पांघल फायनलमध्ये दाखल

भारतीय युवा बॉक्सर अंकुश पांघलने पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात ५-० अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर मुष्टियुद्धाचा वर्षाव करून पांघलने आपले किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.

तेजस्विनची थाळीफेकमध्ये सर्वोत्तम कामगिरी

डेकॅथलॉनच्या थाळीफेकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून तेजस्विन शंकरने पदकांच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखले आहे. शंकरने ३९.६६ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि ६५८ गुण मिळवून पदकाच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवले. गुडघ्याच्या दुखापतीनंतरही त्याची सातत्यपूर्ण कामगिरी कौतुकास्पद आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana