Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीपासून, वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीपासून, वेळापत्रक जाहीर

सामना 15 hrs ago

हाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱया इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

बारावीची लेखी परीक्षा सोमवार, 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा सोमवार, 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

तसेच बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 दरम्यान होतील. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

विषयानुसार अंतिम सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या माध्यमातून त्याची खात्री करून घ्यावी, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana