Dailyhunt
दक्षिण आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

दक्षिण आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

सामना 0 months ago

क्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज रासी व्हॅन डर ड्युसेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 35 वर्षीय ड्युसेनने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली असून, दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणे हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याचे त्याने म्हटले आहे.

“प्रोटियाज जर्सी घालण्यासाठी लागणारा संयम आणि समर्पण अफाट असते आणि या प्रवासाने मला भरभरून दिले आहे,” अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

रासी व्हॅन डर ड्युसेनने वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, परंतु अत्यंत कमी वेळात त्याने मधल्या फळीचा कणा म्हणून स्वतःला सिद्ध केले. त्याने 71 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने 2,657 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये सरासरीच्या बाबतीत तो दिग्गज एबी डिव्हिलियर्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, त्याने 18 कसोटी आणि 57 टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्त झाला असला, तरी ड्युसेन स्थानिक क्रिकेटमध्ये ‘लायन्स’ संघाकडून खेळणे सुरू ठेवणार आहे. भविष्यात दक्षिण आफ्रिकेच्या तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन आणि कोचिंग देण्यावर आपला भर असेल, असेही त्याने स्पष्ट केले. त्याच्या या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीतील एक संयमी पर्वाचा अंत झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana