सीएए कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले. दिल्लीची दंगल पूर्वनियोजित होती. या दंगलीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आहे, असा स्पष्ट आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पंढरपूर येथे राष्ट्रसंत सेना महाराजांच्या 830 व्या जयंतीनिमित्त आयोजित नाभिक समाजाच्या पहिल्या अधिवेशनात ते बोलत होते.
अशा दंगली पुन्हा झाल्या तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

