Friday, 22 Jan, 7.39 am सामना

ठळक
डोंगरीतील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, दोन रिव्हॉल्व्हर आणि ड्रग्ज केले जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने डोंगरीच्या नूर मंजिल इमारतीत छापा टापून अमली पदार्थ बनवणारा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे. ड्रग्जचा कारखाना चालवणारा आरिफ भुजवाला हा पळून गेला असून त्याच्या विरोधात एनसीबी लूक आऊट नोटीस (एलओसी) काढणार आहे. कारवाईदरम्यान एनसीबीने आरिफच्या घरातून 12 किलो ड्रग्ज, 2 कोटी 18 लाख रुपये आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केले आहेत.

मंगळवारी एनसीबीने जे. जे. मार्ग येथे कारवाई करून दोघांना अटक केली होती. त्या दोघांच्या चौकशीत दाऊदचा हस्तक आणि गुंड करीमलालाचा नातेवाईक परवेझ खान ऊर्फ चिंटू पठाणचे नाव समोर आले. परवेझच्या मुसक्या आवळण्यासाठी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे पथक घणसोली येथे गेले. तेथून परवेझ आणि झाकीर हुसेन फझल शेखला ताब्यात घेतले. परवेझकडून 52 ग्रॅम एमडीसह एक पिस्तूल जप्त केले आहे. परवेझला मुंबई पोलिसांनी हद्दपार केल्यावर तो घणसोली येथे राहून ड्रग्जचे नेटवर्क चालवत होता. तो राज्यातील मोठा ड्रग्ज पेडलर असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.

परवेझच्या चौकशीत आरिफचे नाव समोर आल्यावर बुधवारी एनसीबीचे पथक डोंगरीच्या नूर मंजिल इमारतीत गेले. एनसीबीचे पथक येणार असल्याची माहिती समजताच आरिफ हा पळून गेला. त्याच्या घरातून एनसीबीने 2 कोटी 18 लाख रुपये जप्त केले. आरिफने नूर मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ड्रग्ज बनवण्यासाठी एक लॅब तयार केली होती. गेल्या 5 वर्षांपासून ती लॅब सुरू असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. त्या लॅबमधून 12 किलो ड्रग्ज आणि काही केमिकल्स एनसीबीने जप्त केले आहेत. एनसीबीने कारवाईदरम्यान काही महागडय़ा गाडय़ांच्या चाव्या आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. जप्त केलेल्या दोन्ही रिव्हॉल्व्हर तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक

ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय असलेल्या परवेझने घरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक यंत्रणा बसवली होती. जेणेकरून कारवाईसाठी कोण येते याची त्याला माहिती सहज मिळेल. तर ड्रग्जच्या धंद्यातील पैसे हे हवालामार्फत परवेझकडे येत होते.

डोंगरी ते दुबई कनेक्शन

आरिफ आणि परवेझ हे दोघे ड्रग्जचे नेटवर्क चालवत असून त्याचे दुबई कनेक्शन आहे. तर आरिफ हा पठाण गँगची मोडस् वापरून ड्रग्जची तस्करी करत होता. आरिफच्या लॅबमध्ये एनसीबीला काही पाकिटे सापडली असून त्यावर साखर असे लिहिलेले होते. घटनास्थळी एनसीबीला एक डायरी सापडली असून त्यात कोणत्या पेडलरला किती ड्रग्ज दिले, त्याने पैसे किती दिले याचा सर्व हिशेब त्यात आहे.

डीजे रॅपर ड्रग्जच्या धंद्यात

परवेझच्या चौकशीत डी. जे. रॅपर रोहित वर्माचे नाव समोर आले. त्याला अटक करण्यासाठी एनसीबीचे पथक भिवंडी येथे गेले तेव्हा रोहितने एनसीबीच्या अधिकाऱ्याला चावला. रोहित हा डी. जे. रॅपर असून तो काही वर्षांपासून परवेझच्या संपर्कात असून एमडीची विक्री करत होता अशी माहिती एनसीबीला मिळाली आहे.

दाऊदच्या हस्तकाला एनसीबीने केली अटक

नार्कोटिक्स पंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि गुंड करीम लालाचा नातेवाईक परवेझ खान उर्फ चिंटू पठाणला नवी मुंबईतून अटक केली. खान हा दक्षिण मुंबईत एमडी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचा एनसीबीला संशय आहे. त्याच्या संपका&त असणाया पेडलरचा एनसीबी शोध घेत आहेत. नुकतेच एनसीबीने कारवाई करून दोन पेडलरला अटक केली होती. त्या दोघांकडून 65 ग्रॅम एमडी जप्त केले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top