Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Duleep Trophy 2026 - अन् वैभव सूर्यंवशीने पुन्हा एकदा इतिहास रचला, फलंदाजीने नाही तर.

Duleep Trophy 2026 - अन् वैभव सूर्यंवशीने पुन्हा एकदा इतिहास रचला, फलंदाजीने नाही तर.

सामना 2 weeks ago

वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर जगभरात छोट्या वयात मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. न घाबरता गोलंदाजांवर बरसण्याची त्याची पद्धत चाहत्यांना भूरळ पाडतीये. आता वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

मात्र, वैभव सूर्यवंशी चर्चेत आलाय तो आपल्या फलंदाजीसाठी नाही तर, कर्णधारपदाच्या नव्या भुमिकेमुळे. Dullip Trophy 2026 च्या मागील सामन्यात त्याने गोलंदाजीतही कमाल दाखवली होती. आता सेमीफायनलमध्ये कर्णधार म्हणून त्याने घेतलेल्या एका निर्णयाची मोठी चर्चा होत आहे.

ईशान किशनच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सांभाळताना वैभवने दाखवलेली समयसूचकता आणि शांतपणा कौतुकास्पद ठरला असून, त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दलीप ट्रॉफी 2026 चे दोन्ही उपांत्य सामने सुरू झाले असून, पहिला सामना ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात खेळला जात आहे. ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशन दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्याने, उपकर्णधार असलेल्या युवा वैभव सूर्यवंशीने पहिल्या दिवशी कर्णधारपदाची धुरा सांभाळली. यादरम्यान मुकेश कुमारच्या षटकात त्याने घेतलेला डीआरएस (DRS) निर्णय अत्यंत अचूक ठरला, ज्यामध्ये वेळ संपायला अवघे 3 सेकंद बाकी असताना त्याने गोलंदाज आणि यष्टीरक्षकाशी चर्चा करून यशस्वी रिव्ह्यू घेतला. या चमकदार कामगिरीसह वैभव सूर्यवंशीने दलीप ट्रॉफीच्या इतिहासात कर्णधारपद भूषवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरत नवा इतिहास रचला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana