Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ११ सदस्य, तर १५ सरपंच विजयी

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ११ सदस्य, तर १५ सरपंच विजयी

सामना 3 weeks ago

पालघर जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यांत ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये ११ सदस्य आणि १५ सरपंच निवडून आले. ६५ सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज न आल्यामुळे हे सदस्य पदे पुन्हा रिक्त राहिली आहेत.

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये विविध कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाची ही पदे रिक्त झाली होती. त्यासाठी मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील १५ पैकी पाच सरपंच बिनविरोध निवडून आले. तर दहा जागांवर निवडणूक झाली. जिल्ह्यात १६४ सदस्य पदांपैकी ७७ पदे बिनविरोध निवडून आली. तर २२ पदांसाठी निवडणूक झाली. यानंतरही ६५ पदांवर एकही अर्ज न आल्यामुळे ही पदे रिक्त राहिली.

पालघर तालुक्यात १ ग्रामपंचायतीमध्ये ७ सदस्यांसाठी तर ४ सरपंच जागांसाठी निवडणूक पार पडली. वसई तालुक्यातील १ ग्रामपंचायतीच्या १ सदस्य पदाच्या जागेसाठी निवडणूक झाली. डहाणू तालुक्यात ७ ग्रामपंचायतीमध्ये ६ सदस्य पदे तर २ सरपंचांसाठी पोटनिवडणूक पार पडली. वाडा तालुक्यातील ३ ग्रामपंचायती अंतर्गत २ सदस्य आणि २ सरपंच पदासाठी पोटनिवडणूक झाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana