Wednesday, 08 Jul, 5.00 am सामना

ठळक बातम्या
हा तर बॉडिलाईन बॉलर, त्याच्याशी सावधपणे खेळा

>> दिनेश लाड, क्रिकेट प्रशिक्षक

कोरोनाच्या थैमानात आपण आपला संयम अथका आत्मविश्कास गमावून चालणार नाहीये. संकटे मग ती मानवनिर्मित असो अथवा नैसर्गिक ती मानवी जीवनाचा भागच बनून राहिली आहेत. मला 'लिटल मास्टर' सुनील गावसकर यांचे 'या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुवला तो संपला' हे गाणे आठवले. आजच्या या कोरोना महामारीच्या काळात माणसाने क्रिकेटच्या मैदानावर जसे राहतात, तसे प्रत्यक्ष जीवनातही सावध राहायला हवे. कोरोना विषाणू हा तुमच्यावर वेगाने बॉडिलाईन गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याचे बाऊन्सर आणि बिमर्स यापासून तुम्हाला सतत सावध राहावे लागणार आहे. कारण शिस्त सोडून तुम्ही या विषाणूच्या टप्प्यात आलात की, घात झालाच म्हणून समजा. वेगवान गोलंदाजाप्रमाणे कोरोनाचाही अंत पुढे ठरलेला आहे. त्याच्यावर मात करणारी प्रभावी लस भविष्यात येणारच आहे. तोपर्यंत त्याला टाळा, त्याचे डावपेच अपयशी ठरवण्यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि स्कच्छता हे उपाय सुरू ठेवा. आज संकटाचे पहाड आपल्यापुढे उभे असले तरी भविष्यकाळ तुमचाच आहे. कोरोनाचे बिमर्स सांभाळून खेळलात आणि स्वत:ची किकेट वाचवली तर शतकी खेळी तुम्हाला शक्य आहे. कारण आजच्या अंधारात उद्याचा उषःकाल दडलेला असतोच.

मला तो क्रिकेटसम्राट डॉन ब्रॅडमन यांच्या कालखंडातील वेस्ट इंडियन वेस्ली हॉल्स, चार्ली ग्रिफिथ आणि इंग्लंडचा हॅरोल्ड लारकूड यांचा भयानक बॉडिलाईन वेगवान मारा डोळ्यापुढे येतोय. त्या गोलंदाजीची वर्णने मी वाचली आहेत. ब्रॅडमॅनसारख्या महान फलंदाजाला नामोहरम करण्यासाठी 'फास्ट लेग' थेअरी लारवूडने आपले कर्णधार डग्लस जार्डीन यांच्या सल्ल्याने सुरू केली होती. ग्रिफीथच्या एका शरीरवेधी बाउंसरने हिंदुस्थानचा महान फलंदाज नरी कॉन्ट्रक्टर यांची कारकीर्दच संपुष्टात आल्याचे आपल्याला माहित आहे. चीनमधून आलेला कोरोना विषाणू हाही असाच एक बॉडिलाईन गोलंदाज आहे. त्याला नामोहरम करायचे तर आपण सर्कांनी संयम आणि आत्मकिश्कासाने कागायला हकेय. स्वत:वर अनेक बंधने घालून घ्यायला हकीत. आपल्या हिंदुस्थानी परंपरेने दिलेली व्यायामाची, सवस आणि पौष्टिक आहारपद्धतीची देणगीच आपल्याला या महामारीतून वाचवू शकणार आहे. टीम इंडियाने तीनदा क्रिकेटचा विश्वचषक जिंकलाय. त्यात एक टी-20चा होता. आपल्या युवा पिढीने खचून जायचे कारण नाही, कारण आपल्या देशाने अशी कितीतरी महासंकटे झेलत पुन्हा नव्याने उज्वल भरारी घेतली आहे.

युरोपियन राष्ट्रांना बेशिस्तीचा फटका

क्रिकेटमधून आणि आपल्या वागणुकीतून जगाला शिस्तीचे धडे देणारे इंग्लंडचे नागरिक कोरोना महामारीत मात्र प्रत्यक्ष जीवनात बेशिस्त वागले. त्याचाच जबर फटका त्यांना या महामारीत बसला आहे. अमेरिकेपाठोपाठ कोरोना बळीत इंग्लंडचा नंबर लागतो. त्यांनी कोरोनाला टाळण्यासाठीची सोशल डिस्टंसिंग पाळली असती, फास्ट फूड आणि चंगळवादी जीवनाचा हव्यास टाळला असता तर कोरोनाने केलेली जीवितहानी त्यांना टाळता आली असती असे मला तरी वाटतेय. त्यामानाने आपण हिंदुस्थानी नागरिकांनी मोठा संयम दाखवत कोरोनाला नियंत्रणात ठेवले आहे. युरोपिअन देशांना संयम सोडून कागण्याची फार मोठी किंमत कोरोना महामारीत मोजावी लागली आहे.

हिटमॅन'सारखे अपयशातून झेप घेऊ

माझा शिष्य आणि हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांचा लाडका 'हिटमॅन' रोहित शर्माही अनेकदा अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडलाय. अपयशाच्या काळात रोहितला त्याच्यातील गुणांची आणि शक्तीची आठवण मी सतत करून दिली होती. तू अपयश आले म्हणून नाउमेद होऊ नकोस, कारण तुझ्यातील नैपूण्य आणि क्रीडा गुणांची आठवण ठेव. तुझे अपयश प्रासंगिक आहे. ते जाणारच आहे. हि शिकवण रोहितला त्याच्या उज्ज्वल यशासाठी लाभदायक ठरली. तो जसा जिद्दीने क्रिकेट मैदानात यशस्की झाला, तसेच आपणही कोरोनाला पराभूत करण्यात यशस्की ठरू हा विश्वासच आपल्याला तारणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top