Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हरयाणवी गायक अंकित बालियानची जिमबाहेर 20 गोळ्या झाडून निर्घृण हत्या

हरयाणवी गायक अंकित बालियानची जिमबाहेर 20 गोळ्या झाडून निर्घृण हत्या

सामना 3 weeks ago

प्रसिद्ध हरयाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बालियान (वय 35) याची उत्तर प्रदेशातील शामली येथे अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. बुधवारी संध्याकाळी जिमबाहेर पडत असताना चार हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 20 गोळ्या झाडल्या.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अंकितचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकित बालियान हा शामली येथील एका जिममध्ये नियमित जात होता. बुधवारी संध्याकाळी सुमारे 7 वाजता व्यायाम संपवून तो आपल्या कारकडे जात असताना, जिमपासून अवघ्या 20 ते 25 मीटर अंतरावर दबा धरून बसलेल्या 3 ते 4 हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला. गोळ्या डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांत लागल्याने अंकित रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

अंकित बालियान हा त्याच्या 'भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान' या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आला होता. या गाण्यातील गोळीबाराचा उल्लेख त्याच्या खऱ्या आयुष्यात अशा प्रकारे भयानक वास्तव ठरेल, अशी कोणालाही कल्पना नव्हती. या योगायोगामुळे परिसरात प्रचंड हळहळ आणि खळबळ व्यक्त होत आहे.

मूळचा शामली जिल्ह्यातील बंतीखेरा गावचा रहिवासी असलेला अंकित गेल्या काही वर्षांपासून गायन आणि अभिनयासाठी हरयाणातील रोहतक आणि सोनीपत येथे राहत होता. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana