Saturday, 25 Sep, 6.00 am सामना

ठळक
हवाई दलात मोठे फेरबदल, एअर मार्शल संदीप सिंग नवे उपप्रमुख बनणार

हिंदुस्थानच्या हवाई दलामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांची नवे हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी एअर मार्शल संदीप सिंग यांना हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्य वरिष्ठ पदांवरही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

विद्यमान एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया हे 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवरच हवाई दलात वरिष्ठ पातळीवर मोठे फेरबदल होत आहेत. त्यानुसार सध्याचे वेस्टर्न एअर कमांड चीफ एअर मार्शल बालाभद्र राधा कृष्ण यांची नवीन चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (सीआयएससी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अखत्यारित तिन्ही संरक्षण दलांमध्ये सीआयएससीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मागील जवळपास सहा वर्षांत सीआयएससीची सूत्रे स्वीकारणारे एअर मार्शल बालभद्र राधा कृष्ण हे पहिले हवाई दल अधिकारी असतील. वेस्टर्न एअर कमांडमध्ये कृष्ण यांच्या जागी एअर मार्शल अमित देव हे नवे कमांडर बनणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top