भिडाचा तवा तयार करण्याची सोपी पद्धत. तवा प्रथम स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडा करा. त्यावर थोडे तेल घाला आणि चांगले गरम करा. उभा चिरलेला कांदा तव्यावर टाका आणि संपूर्ण तव्यावर तो फिरवून लालसर (गोल्डन ब्राऊन) होईपर्यंत परतून घ्या.
हा परतून घेतलेला कांदा तसाच 4 ते 5 दिवस तव्यावर राहू द्या. त्यानंतर कांदा काढून टाका आणि वापरण्यास सुरुवात करा.

