Dailyhunt
Heatwave - उष्माघाताने शेतकऱ्याचे दोन बैल दगावले, निलंगा तालुक्यात पहिली घटना

Heatwave - उष्माघाताने शेतकऱ्याचे दोन बैल दगावले, निलंगा तालुक्यात पहिली घटना

सामना 2 weeks ago

राज्याच्या विविध भागात सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील निलंगा तालुक्यात तापमान वाढीमुळे कहर सुरू असून तालुक्यातील मौजे सावरी येथील मदन भंडारे यांचे शेतात बांधलेले दोन बैल दगावले असल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मौजे सावरी येथील मदन भंडारे या शेतकऱ्याने नेहमीप्रमाणे संध्याकाळी शेतात आपल्या एका गायीसह दोन बैल ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शेतात गेल्यावर दोन्ही बैल दगावल्याचे लक्षात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनास्थळी औराद शहाजानी येथील पशुधन विकास अधिकारी श्रीमती डॉ ठाकूर यांनी बैलांचे शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही बैल हे उष्माघाताने बळी गेल्याचे निष्पन्न झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांनीही सदरील शेतकऱ्यांच्या बैलांचा स्थळ पाहणी पंचनामा केला व माहिती महसूल प्रशासनाला कळविण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा गावकऱ्यांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana