Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिंदुस्थानचा एफ-57 गोळाफेकमध्ये ऐतिहासिक दुहेरी धमाका; सोमन राणाची 'सुवर्ण'फेक, शुभम जुयालला रौप्य

हिंदुस्थानचा एफ-57 गोळाफेकमध्ये ऐतिहासिक दुहेरी धमाका; सोमन राणाची 'सुवर्ण'फेक, शुभम जुयालला रौप्य

सामना 1 month ago

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या एफ-५७ गोळाफेक स्पर्धेत हिंदुस्थानने ऐतिहासिक दुहेरी यश मिळवले. सोमन राणाने १३.४० मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह सुवर्णपदक पटकावले, तर शुभम जुयालने १३.२८ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह रौप्यपदक जिंकले.

कॅमेरूनच्या सेड्रिक इद्रिस लेकेझो अझामद्झीने १२.५७ मीटर फेकीसह कांस्यपदक मिळवले.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या एफ-५७ गोळाफेक प्रकारातील हिंदुस्थानचे हे पहिले सुवर्णपदक असून, याच प्रकारात प्रथमच दोन हिंदुस्थानी खेळाडूंनी एकाच स्पर्धेत
पदके जिंकण्याची कामगिरी केली आहे.

अंतिम फेरीत शुभम जुयालने पहिल्याच प्रयत्नात १३.०८ मीटरची फेक करत आघाडी घेतली. अखेरच्या प्रयत्नात त्याने १३.२८ मीटरची सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानंतर सोमन राणाने दुसऱ्या प्रयत्नात १३.४० मीटरची फेक करत सुवर्णपदक निश्चित केले.

सोमन राणा हे हिंदुस्थानी लष्कराच्या २/८ गोरखा रायफल्समध्ये कार्यरत असताना २००६ मध्ये पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटात गंभीर जखमी झाले आणि त्यांचा उजवा पाय गमावला. त्यानंतर त्यांनी पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये प्रवेश करून उल्लेखनीय यश मिळवले.

शुभम जुयाल यांनी सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, एसएसबी मुलाखतीला जात असताना झालेल्या मोटारसायकल अपघातात त्यांचा एक पाय गमावला. त्यानंतर त्यांनी पॅरा क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवली. २०२५च्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सातवे स्थान, २०२६ राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य आणि इंडियन ओपन पॅरा अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana