Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिंदुस्थानचा थायफाय विजय

हिंदुस्थानचा थायफाय विजय

सामना 2 weeks ago

सुरुवातीला हिंदुस्थानी फलंदाजांची गोलंदाजांना फोडून काढले आणि नंतर गोलंदाजांनी थायलंडची दाणादाण उडवली. हिंदुस्थानने महिला आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात थायलंडला 94 धावांनी चिरडत थायफाय विजयी सलामी दिली.

शेफाली वर्माच्या तुफानी अर्धशतकानंतर दीप्ती शर्माने थायलंडच्या फलंदाजीचा अक्षरशः बाजार उठवला आणि हिंदुस्थानला दणदणीत सुरुवात करून दिली. शेफालीने अवघ्या 36 चेंडूंत 64 धावा कुटताना आठ चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली. तिच्या तडाख्यामुळे हिंदुस्थान 10 षटकांत 2 बाद 101 अशा भक्कम स्थितीत पोहोचला. मात्र त्यानंतर अचानक विकेट्सचा पाऊस पडला आणि 2 बाद 108 वरून हिंदुस्थानची अवस्था 9 बाद 137 अशी झाली. अखेरीस क्रांती गौडच्या 15 धावांच्या झटपट खेळीने हिंदुस्थानला 159 पर्यंत पोहोचवले.

त्यानंतर 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडला हिंदुस्थानी गोलंदाजांनी अक्षरशः कोंडीत पकडले. दीप्ती शर्माने 1.1 षटकांत 3 विकेट घेत एकही धाव दिली नाही. नंदानी शर्माने 3 विकेट घेत थायलंडचा डाव अवघ्या 65 धावांत 16.1 षटकांत गुंडाळला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana