Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिंदुस्थानच्या क्रिकेट दौऱ्याबाबत बांगलादेश अध्यक्षांचा खुलासा

हिंदुस्थानच्या क्रिकेट दौऱ्याबाबत बांगलादेश अध्यक्षांचा खुलासा

सामना 1 week ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डचे (बीसीबी) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी सांगितले की, हिंदुस्थानसोबत लांबणीवर पडलेल्या मर्यादित षटकांच्या घरगुती मालिकेसाठी चर्चा सुरू आहे आणि दोन्ही देश त्यांच्या व्यस्त वेळापत्रकानंतरही योग्य वेळेचा शोध घेत आहेत.

एका यूटय़ूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तमीम यांनी कबूल केले की, सप्टेंबरमध्ये नियोजित असलेले तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने ठरल्याप्रमाणे होणार नाहीत. या काळात हिंदुस्थान 13 सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. तमीम म्हणाले की, हिंदुस्थानसोबतची मालिका होणार की नाही यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दोन्ही बोर्ड ही मालिका आयोजित करण्याबाबत गंभीर आहेत. बीसीसीआय आणि बीसीबी दोघेही मालिकेच्या वेळेचा विचार करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana