Friday, 20 Sep, 8.50 am सामना

ठळक बातम्या
हिंदुस्थानने केले पाकिस्तानी बॉम्बगोळे निकामी

शस्त्रसंधीचे उल्लंघन करत हिंदुस्थानी सीमेत डागलेले नऊ पाकिस्तानी बॉम्बगोळे हिंदुस्थानी लष्कराने आज निकामी केले. संतडोटे, बासोनी आणि मेंधेर सब डिव्हिजनच्या बालाकोट गावात बुधवारी हे बॉम्बगोळे आढळले.

पाकिस्तानी लष्कर घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी तसेच हिंदुस्थानी जवान आणि नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बॉम्बगोळे टाकत आहेत. पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीम (बॅट)च्या कमांडोकडून घुसखोरी करतानाचा व्हिडीओ हिंदुस्थानी लष्कराने जारी केला होता. त्या आधी 4 ऑगस्टला सीमेत घुसखोरी करताना पाकिस्तानी बॅट आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top